कोजागिरी पौर्णिमीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त हरीश बैजल यांनी काढला आदेश

0

सोलापूर,दि.१६ : कोजागिरी पोर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाण्याची परंपरा आहे. अनेकजण पायी चालत जातात. दिनांक १९/१०/२०२१ रोजी कोजागिरी पोर्णिमेनिमित्त तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरीता मोठयाप्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूरकडे पायी चालत जाण्याची परंपरा आहे. तथापी जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण उस्मानाबाद यांच्याकडील आदेशान्वये कोजागिरी यात्रेचे आयोजन रदद करण्यात आले आहे. व राज्यातील व राज्याबाहेरील सर्व नागरीकांना यात्रेकरीता दि.१८/१०/२०२१ ते दि.२०/१०/२०२१ दरम्यान जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

भाविकांना जरी यात्रेकरीता तुळजापुर शहर बंदी असली तरी इतर ठिकाणावरुन भाविक तुळजापुरक कडे पायी चालत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, या करीता भाविक पायी चालत जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने अन्यमार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी त्यांचेकडील जाहीरनाम्यात नमुद केले आहे. त्यामुळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी त्यांना प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) आणि प्राप्त सर्व अधिकारान्वये खालील प्रमाणे आदेश दिले आहेत. दि.१८/१०/२०२१ रोजीचे ००.०१ ते दिनांक २०/१०/२०२१ रोजीचे २४.०० वा. पर्यंत बंद करण्यात आलेला मार्ग

१. सोलापूर ते तुळजापूर पर्यायी मार्ग :- सोलापूर-बोरामणी-इटकळ मंगरूळपाटी-तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील.

२. सोलापूर ते उस्मानाबाद• पर्यायी मार्ग: सोलापूर-वैराग या मार्ग पथक्रमण करतील.

३. सोलापूर ते लातुर
पर्यायी मार्ग :- सोलापूर-बार्शी- येडशी-ढोकी-मुरुड-लातुर या मार्गे पथक्रमण करतील.

४. सोलापूर ते औरंगाबाद
पर्यायी मार्ग :- सोलापूर-बार्शी- येरमाळा या मार्गे पथक्रमण करतील.

बंदी आदेश लागू नसलेली वाहने

०१) केंद्र व राज्याचे सरकारी वाहने

०२) अग्निशामक दलाची वाहने

०३) एस.टी. बसेस

०४) सर्व पोलीस वाहने

०५) रुग्णवाहिका

०६) अत्यावश्यक सेवेतील वाहने

०७) या मार्गावरुन शासकिय / अशासकिय संस्था किंवा व्यक्तींची शहर वाहतूक शाखेने परवानगी दिलेली वाहने

सोमवार दि.१८/१०/२०२१ रोजीचे ००.०१ ते दिनांक २०/१०/२०३९ रोजीचे २४.०० वा. पर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचा भंग करणारा कायदयाप्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here