दि.19 : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. नवविवाहित दाम्पत्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरदेव आणि नवरी आपल्या लग्नानंतर जबरदस्त डान्स (Dance Video of Bride and Groom) करताना दिसत आहेत.
इन्स्टाग्रामवर व्हायरल (Instagram Reels) होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव रस्त्याच्या कडेला उभा आहेत. काही वेळानं अचानक ते दोघंही डान्स करू लागतात. नवरी आणि नवरदेवाचा हा जबरदस्त डान्स आणि आनंद पाहून शेजारचे लोकही हसू लागतात. ढोल आणि गाण्यांवर नाचणाऱ्या या नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

नवरीबाईचा हा स्ट्रीट डान्स लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओमध्ये नवरीबाईचा संपूर्ण चेहरा दिसत नाही. मात्र, तिचे डान्स मूव्ह पाहूनच जाणवतं की ती किती आनंदात आहे. या व्हिडिओ भरपूर लाईक मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत नवरीच्या डान्सचं कौतुकही केलं आहे.