विनायक दीक्षित/कुर्डुवाडी,दि.१ : आपली ७ वर्षाची नात घराबाहेर खेळत असताना अचानक (रोहा येथून) बेपत्ता झाली. रेल्वे स्थानक परिसरात शोध घेत असता कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना आजीने सांगितले. या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही माहिती निरीक्षक राजेंद्र जगताप यांना दिली.
त्यानंतर निरीक्षक जगताप यांनी तातडीने सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व स्थानकांवर याबाबत माहिती देत तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर रोहा वरुन कल्याण येथे जाणाऱ्या रेल्वे कामगार गाडीमध्ये एक मुलगी आढळून आली.
पोलीस सुरेंद्र व शिवाजी यांना जवान रुदल प्रसाद यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने आजी कडे चौकशी केली. असता वर्णनावरून तीच मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने कल्याण ला जाणाऱ्या रेल्वेतून ताब्यात घेत चिमुकलीला अवघ्या दोन तासांत आजीच्या हवाली केले.
या प्रकरणात पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी राज्यात अलिकडेच बालिकांवर होणा-या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सुत्रे हलवली व केवळ दोन तासांत आजीच्या हवाली केल्याने संभाव्य धोका टळला.
रोह्याचे पोलिस निरिक्षक राजेंद्र जगताप हे कुर्डुवाडीचे असल्याने ही बातमी समजताच मित्र परिवार व नातेवाईक यांनी त्यांचे कौतुक केले.