व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी HSC आणि CET दोन्ही गुणांना मिळणार महत्त्व

0

मुंबई,दि.2: राज्यात (Maharashtra UG Admissions 2022-23) पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना इयत्ता 12वी आणि सामायिक प्रवेश चाचणी (CET) गुणांना समान महत्त्व दिले जाईल असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले आहे. म्हणजेच 12 वीमध्ये विद्यार्थ्याला किती गुण मिळाले आणि CET परीक्षेत त्याचे टेस्ट स्कोर काय होता? दोन्ही पाहिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले की, नवीन प्रणाली या वर्षापासून लागू केली जाणार नाही, तर पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून लागू केली जाईल.

सध्या, अभियांत्रिकी, कायदा आणि इतर अभ्यासक्रमांचे (Maharashtra UG Admissions 2022-23) प्रवेश सीईटी स्कोअरच्या आधारे केले जातात. सामंत यांनी पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नवीन प्रणालीअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केवळ सीईटीचे गुण ग्राह्य धरले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले

याबाबत उच्च शिक्षणमंत्री सामंत म्हणाले, “सध्याची पद्धत लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केवळ सीईटीवरच भर दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बारावी आणि सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांना समान महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या अभ्यासासोबतच चांगला पाया तयार करण्यास मदत होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here