स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात नोंदवली गेली सर्वाधिक वाढ

0

मुंबई,दि.21: स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या (Gold) दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव ठरलाय. सोन्याचे दर 63 हजार रुपये प्रती तोळा झाले असून 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ झाली आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Hamas Conflict) सुरू असलेल्या युद्धाचा सुवर्ण बाजारावर झाला असून आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

उच्चांकी भाव

सुवर्ण नागरी जळगावच्या इतिहासामध्ये सोन्याचा भाव विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झालीय. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा अंतरराष्ट्रीय बाजारांवर झाला असून यामुळे सोन्याचे भावही वाढले आहेत. त्यातच स्थायी गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून आगामी काळात सोन्याचे दर हे 70 हजार रूपये प्रतितोळा होण्याची शक्यता देखील सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

आज सोन्याचा भाव जीएसटी सहित 63 हजार रुपये प्रती तोळा तर चांदीचे भाव 76 हजार रुपये प्रतीकिलो आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेण्याची प्रथा असते, पण पुन्हा सोन्याचे दर वाढल्याने आमचे आर्थिक गणित बिघडले असून कमी सोनं खरेदी करावे लागत असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here