मुंबई,दि.16: (Dhangar Reservation): आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा धक्का दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा झटका दिला आहे. धनगर समाजानेही एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आग्रमक भूमिका घेतली होती.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. तसेच यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. आता धनगर समाजासमोर याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे.
धनगर समाजाने गेल्या काही महिन्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात आंदोलन आणि मोर्चे काढले होते. सध्या धनगर समाजाला एनटी (भटक्या जमाती) प्रवर्गाचे साडेतीन टक्क्यांचे आरक्षण आहे. एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजाचे आरक्षण 7 टक्क्यांवर गेले असते. मात्र, धनगर समाजाला अनुसूचित जातींचे आरक्षण देण्यासाठी पूर्तता आणि पडताळणीचे निकष पूर्ण होत नसल्याचे कारण देत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या.