राज्यात असलेले सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगेबाज असलेलं सरकार आहे

0

राज्यात केव्हाही निवडणुका होऊ शकतात आशिष शेलार यांनी केला दावा

पुणे,दि.1 : राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे. 2 पक्षाचे संकेत जे आमच्याकडे येत आहेत. त्यावरून राज्यात निवडणूक केंव्हाही लागू शकते, असा दावाच भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मावळमध्ये भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आशिष शेलार बोलत होते.

‘राज्यात असलेले सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगेबाज असलेलं सरकार आहे. राष्ट्रवादी हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज असे हे तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेनेने मोदींचा फोटो वापरून निवणुकीत यश मिळवलं तर निवडणूक झाल्यानंतर दगेबाजी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष दगेबाजच असणार आहे, अशी टीकाही आशिष शेलारांनी केली.

मुख्यमंत्र्यांची कुलदैवत असलेल्या एकविरा गडाचा देखील विकास झालेला नाही. दगाबाजी करून सरकारमध्ये बसले तरी विकासासाठी मात्र काहीच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुलदैवत असलेल्या मावळमधील कार्ला एकविराचा पण साधा विकास देखील नाही. दोन वर्ष सत्ता उपभोगत असताना देखील कार्लाकडे दुर्लक्ष केले. तर राज्याचं काय असेल? स्वतःच्या कुलदैवतासाठी आणि आमच्या एकविरा तरी मुख्यमंत्र्यांनी कार्ला एकविरा गडाचा तरी विकास करावा, अशी टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here