Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर राज्यातील या महापालिकेने घेतला हा निर्णय

0

Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण आढळल्यानंतर अनेक देशात खळबळ माजली होती. भारतातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळले. महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनने शिरकाव केल्यानंतर सतर्कता बाळगली जात आहे. नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. जळगाव (Jalgaon) शहरात आता कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र (Certificate of Corona Vaccination) दाखविल्याशिवाय वाहनधारकांना पेट्रोल मिळणार नसल्याचे आदेश महापालिका उपायुक्त शाम गोसावी यांनी काढले आहेत. शहरातील बँका, हॉटेल, मॉलसह व मोठ्या दुकानांमध्येही लसीकरण प्रमाणपत्राशिवाय (Certificate of Corona Vaccination) प्रवेश मिळणार नाही.

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरणाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता हॉटेल, बँक, पेट्रोल पंप व मोठ्या दुकानांमध्ये जाताना ग्राहकांकडून लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करून घेण्याचे आदेश मनपाने काढले आहेत. या नियमांची कठोर अंमलबजावणी महापालिकेच्या पथकांमार्फत शुक्रवारपासून केली जाणार आहे.

मनपाच्या निर्णयाची अंमलबजावणी ज्या अस्थापनांकडून केली जाणार नाही, अशा आस्थापना मालकांवर मनपाकडून मोठी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये 10 ते 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्राहक, वाहनधारकांकडून लसीकरणाचे प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी देखील संबधित आस्थापना मालकांवर देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व मनपाने काढलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. यासाठी प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत मनपाच्या इतर अधिकाऱ्यांवर देखील ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी विशेष पथकांची नियुक्ती देखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here