Painless Death Machine : वेदनारहित मृत्यू देणाऱ्या मशिनला या देशाने दिली मंजुरी

1

Painless Death Machine : अनेक आजारांनी ग्रस्त व्यक्तींना इच्छामरणाची (euthanasia) इच्छा असते. अनेकजण इच्छामरणाची (euthanasia) परवानगी मागतात. अनेकांना वेदना सहन करत जगावे लागते. अशा व्यक्ती इच्छामरणाची (euthanasia) परवानगी मागतात. इच्छामरणाची (euthanasia) जगात नेहमीच चर्चा होत असते. भारतातही कित्येक वर्ष यावर खल सुरू होता. दरम्यान, युरोपीय देश स्वित्झर्लंडने (Switzerland) इच्छामरण (euthanasia) देण्याऱ्या यंत्राला (painless death machine) कायदेशीर मान्यता दिली आहे. एक मिनिटांत वेदनारहित (painless death machine) आणि शांततापूर्ण मृत्यू देणारी शवपेटी आकाराची (coffin-shaped) कॅप्सूल स्वित्झर्लंडमध्ये कायदेशीर करण्यात आली असल्याची माहिती याच्या निर्मात्यांनी दिली आहे. या पेटीत ऑक्सिजन पातळी (Oxygen Level) कमी करून हायपोक्सिया (hypoxia) आणि हायपोकॅप्निया (hypocapnia) द्वारे मृत्यू दिला जातो.

हे मशीन शवपेटीच्या आकाराचे असून ऑक्सिजनची पातळी हळूहळू कमी करून हायपोक्सिया आणि हायपोकॅप्नियाद्वारे मृत्यू देते. (painless death machine) या प्रक्रियेत नायट्रोजनचे प्रमाण अवघ्या 30 सेकंदात अनेक पटींनी वाढते, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी 21 टक्क्यांवरून 1 पर्यंत वाढते आणि काही सेकंदातच माणसाचा मृत्यू होतो.

आजारपणामुळे बोलता किंवा हालचाल करू न शकणाऱ्या रुग्णांसाठी हे मशीन उपयुक्त असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. वापरकर्त्याला हे मशीन त्याच्या पसंतीच्या ठिकाणी न्यावे लागेल. नंतर मशीनचे डिग्रेडेबल कॅप्सूल वेगळे केले जाते जेणेकरून ते शवपेटी म्हणून वापरले जाऊ शकते.

हे मशीन बनवण्याची कल्पना एक्झिट इंटरनॅशनलचे संचालक आणि डॉक्टर फिलिप नित्शके यांनी दिली आहे, ज्यांना ‘डॉक्टर डेथ’ असेही म्हणतात. कोणतीही अनपेक्षित अडचण न आल्यास पुढील वर्षभरात आम्ही हे सार्को मशीन देशात उपलब्ध करून देऊ. पुढे ते म्हणाले, की हा आतापर्यंतचा खूप खर्चिक प्रकल्प होता. पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही आता तो सुलभ करण्याच्या अगदी जवळ आलो आहोत.

स्वित्झर्लंडमध्ये मदत घेऊन मृत्यू पत्करणे कायदेशीर मानले जाते आणि गेल्या वर्षी 1300 लोकांनी आत्महत्या करण्यासाठी या सेवेचा वापर केला. मात्र, या मशीनवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. लोकं डॉक्टर डेथवरही टीका करत आहेत. ते म्हणतात की ते गॅस चेंबरसारखे आहे. हे यंत्र आत्महत्येला प्रोत्साहन देते, असेही काहींचे म्हणणे आहे. सध्या, फक्त दोन Sarco प्रोटोटाइप अस्तित्वात आहेत. मात्र, तिसरे मशीन 3D प्रिंट करत असून ते पुढील वर्षी स्वित्झर्लंडमध्ये ऑपरेशनसाठी तयार होईल अशी अपेक्षा आहे.

इच्छामरणाला भारतातही परवानगी पण..

इच्छा मृत्यूपत्र करण्याच्या अधिकाराबाबत 2005 मध्ये ‘कॉमन कॉज’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. संविधानाच्या अनुच्छेद 21 अनुसार नागरिकांना जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर इच्छा मृत्यूचाही अधिकार देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यावर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही अटीशर्थींसह इच्छामरणाला परवानगी दिली आहे.

दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णाला, आपण आता बरं होऊ शकत नाही, याची जाणीव होईल, तेव्हा आपल्याला जबरदस्तीने व्हेंटिलेटरवर ठेवू नये, अशी मागणी ती व्यक्ती करु शकते. त्यावर मरणासन्न व्यक्तीला इच्छा मृत्यूपत्र तयार करण्याचा अधिकार दिला जाऊ शकत नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं. परंतु, वैद्यकीय मंडळाच्या आदेशानंतर मरणासन्न व्यक्तीचं व्हेंटिलेटर काढल्या जाऊ शकतं असं सरकारनं सांगितलं होतं.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here