सोलापूर,दि.१३: सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लस हे मोठे हत्यार आहे. आजच्या अहवालात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सोलापूर शहर नवीन २१८ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३११३५ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८१२८ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार (ॲक्टिव्ह) घेत असलेल्या बाधितांची संख्या १५३७ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४७० झाली आहे. यात ९३९ पुरुष व ५३१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ८५० अहवाल प्राप्त झाले. यात ६३२ निगेटिव्ह तर २१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १३२ पुरुष आणि ८६ महिलांचा समावेश आहे. आज ३ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर २० बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

