Shinde Group: ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाला शिंदे गट आणखी धक्का देणार?

Shinde Group: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं बॅनर लावलं आहे

0

ठाणे,दि.12: ठाण्यात राष्ट्रवादी (NCP) पक्षाला शिंदे गट (Shinde Group) आणखी धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे. ठाणे म्हटले की आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जोरदार धक्का बसला आहे. आज राष्ट्रवादीचे काही नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर काल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. हे दोन धक्के बसले असतानाच आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चक्क श्रीकांत शिंदे यांचं बॅनर लावलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बॅनरवर शिंदे यांचा फोटो | Shinde Group

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं बॅनर लावलं आहे. नगरसेवक राजन किणी, अनिता किणी, राजू अंसारी, विशू भागय आणि मोरेश्वर किणी यांनी श्रीकांत शिंदे यांचं बॅनर लावलं आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचं उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचं बॅनर या नगरसेवकांकडून लावण्यात आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा फोटो गायब

विशेष म्हणजे हे बॅनर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लावून देखील बॅनरवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा फोटो गायब आहे. मात्र या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांचा फोटो लावण्यात आला आहे. आज ठाण्यातील राष्ट्रवादीचे चार नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर लवकरच हे नगरसेवक देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे. राष्ट्रवादीला यापेक्षाही मोठा झटका देणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here