मुंबई,दि.21: Thackeray Shinde Group News: शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आला आहे. प्रभादेवी (Prabhadevi) रेल्वे स्टेशन परिसरात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) आमनेसामने आला. यापूर्वी ठाण्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाला होता. ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला होता.
या वादात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. घटनेप्रकरणी रात्री उशीरा श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विकासकामांच्या उदघाटन करताना श्रेयवादाच्या मुद्यावरुन दोन्ही गट समोरासमोर आल्याचं कळतं. ठाकरे गटाकडून यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या भागातील विकासकामांचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होणार होतं. परंतु यावेळी तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करुन उद्घाटनाला विरोध करण्यात आला. यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ याच्या नुतनीकरणाचं हाती घेण्यात आलं होतं. या नुतनीकरणाच्या कामाचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होत होतं. मात्र याचवेळी ठाकरे गटाते कार्यकर्ते इथे दाखल झाले. हे काम ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केलं आहे. त्यांनीच या कामाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे याचं श्रेय शिवसेनेच्या ठाकरे गटाला जातं, असा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
यावरुन श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित झाला. समाधान सरवणकर हे उद्घाटन करत असतानाच ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला. याबाबत अजय चौधरी यांना विचारलं असता ते म्हणाले की, याचं संपूर्ण काम मी केलं असताना शिंदे गटाकडून अशाप्रकारे उद्घाटन केलं जात असेल तर आम्ही विरोध करु. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट विकासकामांच्या नुतनीकरणाच्या उद्घाटनाच्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकले.