Sushma Andhare: शिवजयंतीनिमित्त सुषमा अंधारे यांचं भावनिक पत्र, ‘आम्हाला माफ करा..’

0

मुंबई,दि.१९: Sushma Andhare’s Emotional Letter: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी लिहिलेलं पत्र चांगलंच व्हायरल झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवनेरी गडावर आज राज्याच्या पर्यटन विभागाकडून शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

सुषमा अंधारे यांचं भावनिक पत्र… | Sushma Andhare’s Emotional Letter

त्यानंतर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचं एक भावनिक पत्र व्हायरल होतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माफ करा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी हे पत्र लिहिलं आहे. फितुरांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जात आहे, अशी टीका अंधारे यांनी केली आहे.

तसंच शिवरायांच्या हयातीत गद्दार ताठ मानेनं फिरतोय असं कधी घडलं नाही. पण यापुढे आता पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही असं वचन आम्ही तुम्हाला देतो, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सरकारला रोखठोक आव्हान दिलं आहे.

काय म्हटलं आहे सुषमा अंधारे यांनी पत्रात? | Sushma Andhare

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,
आम्हाला माफ करा..
आज तुमच्या जन्मदिनी,
स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..

तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय,
असे कधीही घडले नाही…
पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,
असे वचन आम्ही तुम्हाला देतो..

शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच,
फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या!
स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या!
आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!

हर हर महादेव !!

तुमचा खरा मावळा,
सच्चा शिवसैनिक.

हे पत्र सुषमा अंधारे यांनी लिहिलं आहे. जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. या पत्रातून त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. तर त्यांच्यासोबत गेलेल्यांना ढोंगी कावळे असं म्हटलं आहे. आता या पत्राला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here