Sushma Andhare: नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे म्हणाल्या…

Sushma Andhare: सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

0

सोलापूर,दि.२८: Sushma Andhare On Devendra Fadnavis: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडिओ ट्विट करत भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला आहे. अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यानंतर अंधारे यांचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

अंधारे यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी (BJP Devendra Fadnavis) विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आमच्या श्रीकृष्णाबद्दल तुमच्या नेत्या बोलतात, पण तुम्ही त्याबद्दल काहीही बोलत नाही. तुम्ही मूग गिळून बसलेले आहात, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला. यानंतर आता अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

Sushma Andhare On Devendra Fadnavis
सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी ट्विट केला व्हिडिओ | Sushma Andhare On Devendra Fadnavis

अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले आहेत. तसेच फडणवीसांनाही खोचक टोला लगावला आहे. “देवेंद्रभाऊ वादाला तोंड फुटलेच आहे तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.  हे भाजपाचे लोक आहेत की परग्रहावरचे? आणि यावर आपलं नेमकं मत काय आहे? बाकी तुम्ही माझ्यावर हल्ला करण्याइतके अस्वस्थ झालेलं बघून आनंद वाटला” असं म्हणत टीकास्त्र सोडल आहे. 

…अशाने चिडका बिब्बा नाव पडेल | Sushma Andhare News

“बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने ‘चिडका बिब्बा’ नाव पडेल” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे य़ांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “भाऊ शेवटचे दोनच प्रश्न. माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून तेरा वर्ष मागे जाऊन उत्खनन का केलं आणि करायचं उत्खनन तर तेरा वर्ष का वाट बघितली की तेव्हा मी शिवसेनेत नव्हते म्हणून भीती वाटली नाही. शेवटचा प्रश्न बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने #चिडका_बिब्बा नाव पडेल बरं” असं म्हटलं आहे. 

जाहिरात
भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या चौकशी का थांबल्या?

“भाऊ महाप्रबोधन यात्रेतून तुम्हाला महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, असंघटित कामगार संबंधाने प्रश्न विचारते, भाजपाच्याच 15 लोकांना clean chit कशी मिळाली? Bjpचे सगळेच स्वच्छ कसे ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या चौकशी का थांबल्या? कित्ती साधे प्रश्न विचारले?” असं देखील अंधारे यांनी म्हटलं आहे. 

हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत

सुषमा अंधारेंनी फडणवीसांच्या आरोपांना सोलापुरातून प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. 13 वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का? तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही. यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही. हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत, असे म्हणत सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर पलटवार केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here