सोलापूर,दि.७:Sushma Andhare Shared Video: शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या IPS अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषण व्हायरल झाले होते. यानंतर विरोधकांनी पवार यांच्यावर टीका केली होती. (Sushma Andhare On Ajit Pawar)
अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी पोलिसांसह डीएसपी अंजना कृष्णा माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. सोलापूरमध्ये डीएसपी म्हणून तैनात असलेल्या अंजना कृष्णा बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी पोहोचल्या होत्या तेव्हा ही घटना घडली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन केला. त्यानंतर त्या कार्यकर्त्याने तो फोन अंजना कृष्णा यांना दिला. अजित पवारांनी कारवाई करेन असे महिला अधिकाऱ्यांना सांगितले.
डीएसपी अंजना कृष्णा यांनी आपण उपमुख्यमंत्रीच बोलत आहेत कशावरून असे म्हटल्यानंतर अजित पवार यांनी IPS कृष्णा यांच्या मोबाईलवर फोन करून कारवाई थांबवण्यास सांगितले. तसेच माझा चेहरा तर ओळखू शकाल ना? तुमची एवढी हिंमत वगैरे भाषेचा वापर पवारांनी केला होता.
ज्या व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावत डीएसपी अंजना कृष्णा यांना फोन दिला होता. त्या व्यक्तीचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती गांजा पित असल्याचे दिसून येत आहे.
सुषमा अंधारे यांची पोस्ट | Sushma Andhare Shared Video
दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच..
याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं..! दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली..!!
..अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसाना तरी तोंड दाखवायला जागा राहील का ? किरीट चं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे.
जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनोन महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे..! असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.