Sushma Andhare On Eknath Shinde: ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून…’ सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

0

मुंबई,दि.20: Sushma Andhare On Eknath Shinde: शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर कधीही निकाल येऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांवर अपात्रेची कारवाई होणार की नाही हे निकाल लागल्यानंतर कळेल. मात्र यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राजीनामा तयार ठेवण्याच्या दिल्लीतून सूचना देण्यात आल्याची बातमी गुजरातमधील वृत्तपत्रात छापून आल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज केला आहे.

सुषमा अंधारे यांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण | Sushma Andhare On Eknath Shinde

या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा दावा केला आहे.   

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा दोन दिवसापासून सुरू आहे. अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. या चर्चांना काल अजित पवार यांनी पूर्णविराम देत मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आता शिवेसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक मोठा दावा केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

सुषमा अंधारे म्हणाल्या, गुजरातमधील एका वृत्तपत्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एक बातमी छापून आली आहे. या बातमीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना  दिल्लीतून देण्यात आल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. भाजप एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते. यावर अजुनही नार्वेकरांना स्पष्ट भूमीका मांडलेली नाही. याचाच अर्थ भाजपने पडद्याआड ही ठरलेली रणनीती आहे. 

काही दिवसातच शिवसेनेतील 16 आमदारांच्या संदर्भातील निकास सुप्रीम कोर्ट देणार आहे. यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चाव सुरू आहेत.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here