सुषमा अंधारेंचा शिवसेना प्रवेश, मिळाली ही मोठी जबाबदारी

1

मुंबई,दि.28: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवबंधन बांधलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे.

यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पक्षात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना उपनेतेपदाचं गिफ्ट देखील मिळालं आहे. प्रवेशावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

सुषमा अंधारे या फुले-शाहू आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध वक्त्या आहेत. त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी आपल्या सर्वांचा एकच संवैधानिक शत्रू असेल, तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. सुषमा अंधारे याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार केला होता.

यावेळी ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करून संविधानिक चौकट तोडली जात आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझं हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्याचे नाही. तेव्हा मी ठरवलं की शिवसेनेत जायचे. माझ्या डोक्यावर कुठल्या ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही. आणि मला अजून पीठ मिठाचे मातोश्रीमधील डबे माहित नाहीत. मी नवीन आहे. नीलमताई माझ्यासाठी आईप्रमाणे आहेत. अनेक जण म्हणाले की, मी टीका केली होती. पण आमचं एकच संविधानिक शत्रू असेल तर मी त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, असं त्यांनी म्हटलं.


1 COMMENT

  1. Tai sarva pratham tumhala Shiv seneth pravesh kelya baddal hardik subheccha tum cha sarkhi aabhyaasu vaakta he Shiv senela bhetne manze senela lotri laagli aahe ……👍👍🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here