Sushilkumar Shinde: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरात निवडणुकीच्या संदर्भात मोठं वक्तव्य

0

सोलापूर,दि.28: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी सोलापुरात (Solapur) लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी लाेकसभा निवडणूक लढणार नसल्याचे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा दोनदा पराभव झाला आहे.

Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

काँग्रेस भवनामध्ये ध्वजारोहण | Sushilkumar Shinde News

भारतात काँग्रेस पक्ष स्थापन होऊन 137 वर्षे पूर्ण झाले. त्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहरातील काँग्रेस भवनामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.

जाहिरात

यापुढील काळात निवडणूक लढविणार नाही: सुशीलकुमार शिंदे

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना शिंदे म्हणाले, “काॅंग्रेसचा आज स्वाभिमानाचा दिवस आहे. काॅंग्रेसचा झेंडा हातात घेउन निघालेली आमची मंडळी देशात पुन्हा परिवर्तन करतील यात शंका नाही. मी यापुढील काळात निवडणूक लढविणार नाही. पक्षात कार्यरत राहीन.” 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतच राहणार

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतच राहणार आहेत, मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सुप्रीम कोर्टात पाठवला, महाराष्ट्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना आणखीन कार्यकाळ पूर्ण करायचा आहे अशी टीका त्यांनी केली. यापुढे लोकसभा लढविणार नाही, पण पक्षात सक्रिय राहणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here