Suresh Raina’s Father Passes Away: भारतीय क्रिकेपटू सुरेश रैनाच्या वडिलांचे निधन, ते भारतीय सैन्यात होते

0

दि.6:Suresh Raina’s Father Passes Away: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचे (Suresh Raina) वडील त्रिलोकचंद रैना यांचे रविवारी निधन झाले. त्रिलोकचंद दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. गाझियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्रिलोक चंद रैना हे भारतीय लष्कराचा एक भाग होते आणि बॉम्ब बनवण्यात महारत होते. तसे, रैनाच्या वडिलांचे वडिलोपार्जित गाव ‘रैनवारी’ हे जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात आहे. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर त्यांच्या वडिलांनी गाव सोडले. त्यानंतर हे कुटुंब मुरादनगर शहरात स्थायिक झाले.

सुरेश रैनाच्या वडिलांचे मासिक उत्पन्न 10,000 रुपये होते, त्यामुळे ते आपल्या मुलाला उच्च क्रिकेट कोचिंग फी देऊ शकत नव्हते. लवकरच त्रिलोकचंदचा त्रास दूर झाला, जेव्हा 1998 मध्ये रैनाला लखनऊच्या गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये 1998 मध्ये प्रवेश मिळाला.

रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

सुरेश रैनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे वडील निधन झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेत असत. या कुटुंबांना तो आर्थिक मदत करत असे. त्यासोबतच त्यांना ज्या सुविधा मिळाव्यात त्या मिळतील याची काळजी घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here