Sunil Raut On Nitesh Rane: नितेश राणे यांनी केलेल्या दाव्यावर सुनील राऊत म्हणाले…

Sunil Raut: 10 पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये

0

मुंबई,दि.7: Sunil Raut On Nitesh Rane: भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा दावा केला होता. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या दाव्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत राज्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. संजय राऊत 10 जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणीही सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची अटच अशी आहे की अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो. असे संजय राऊत यांनी शरद पवारांना सांगितले आहे, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला. यानंतर आता संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी यावर भाष्य करताना प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले सुनील राऊत? | Sunil Raut On Nitesh Rane

104 दिवस तुरुंगात काढले, पण भाजपासमोर गुडघे टेकले नाहीत. नेपाळी नितेश राणेने शिवसेनेच्या संजय राऊतांना बोलू नये. संजय राऊत शिवसेनेचा भक्त आहे. जो जन्मलाही शिवसेनेत आणि शेवटचे आयुष्यही शिवसेनेत जाईल. आमचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही. शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर असलेले प्रेम, श्रद्धा हा वेगळा विषय आहे, असे सुनील राऊत यांनी म्हटले आहे. 

नितेश राणे नक्की भाजपाचे आमदार आहेत का?

नितेश राणे नक्की भाजपाचे आमदार आहेत का? कारण शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी, भाजप असे 10 पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये. संजय राऊत बाळासाहेबांचे भक्त आहेत. उद्धव ठाकरेंवरील निष्ठा असलेले शिवसैनिक आहेत, असेही सुनील राऊत यांनी नमूद केले. 

काय म्हणाले होते नितेश राणे?

दरम्यान, आम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंना सांगत होतो की संजय राऊत साप आहे. बाळासाहेब ठाकरे असताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भांडणं लावली. जेव्हा संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. या एका माणसामुळे तुम्ही किती लोकांना तोडले, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here