सोलापूर,दि.२७: भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुनील कामाठी (Sunil Kamathi) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. (Sunil Kamathi passed away)
कामाठी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची किडनी खराब झाली होती. शनिवारी दिवसभर ते सर्वांशी बोलत होते, रविवारी दुपारी मात्र त्यांची तब्येत अत्यंत खालावली. त्यांना एअर अंबुलन्स मधून मुंबईला हलवण्याचे नियोजन करण्यात आले होते. शेवटी सोमवारी पहाटे पाचच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
खड्डा तालीमच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव… | Sunil Kamathi
खड्डा तालीमचे सुनील कामाठी प्रमुख होते. खड्डा तालीमच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नुकतेच झालेल्या शिवजन्माचा मिरवणुकीमध्ये सुनील कामाठी यांच्या खड्डा तालीमने मोठी जंगी मिरवणूक काढली होती. तसे पाहायला गेले तर सुनील कामाठी हे पूर्वीचे कट्टर शिवसैनिक होते.
2017 सालच्या महापालिका निवडणुकीत त्यांना भाजप कडून तिकीट मिळाले आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला तेव्हापासून ते माजी पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जात होते.