बाळे येथील प्राणघातक हल्ला प्रकरणी सुनील भोसले यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१९: सोलापूर बाळे येथील प्राणघातक हल्ला प्रकरणी सुनील भोसले यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बाळे येथील जुन्या भाडंणाच्या वादातून फिर्यादीस लाकडाने, लाथाबुक्यांनी मारून व गळ्यावर ब्लेडने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेप्रकरणी फौजदार चावडी पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात सुनील अंबादास भोसले रा. सोलापूर याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी मंजूर केला.

यात हकीकत अशी की,दि.१८/६/२३ रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विकास ऊर्फ पप्पू सुरेश दोरकर हा घरासमोर उभा होता. त्यावेळी समाधान सरवदे, किरण सरवदे व बापू सरवदे हे तिघेही मोटारसायकलवर येवून फिर्यादीस तु माझ्याकडे रागाने का पाहत होता, आपण आपला वाद मिटवून घेवू तु आमच्यासोबत अंबिका नगर येथे चल असे म्हणून त्यास सोबत घेऊन जावून त्याठिकाणी सुनील भोसले, बाबासाहेब भोसले, बाळू भोसले, सचिन भोसले, मोहन शिंदे हे रिक्षामध्ये बसलेले होते.

त्यावेळी समाधान सरवदे,किरण सरवदे यांनी रिक्षामधून लाकूड काढून फिर्यादीचे डोक्यात मारले व बापू सरवदे याने दगडाने डोक्यात मारले तर सुनील भोसले, बाबासाहेब भोसले, बाळू भोसले, सचिन भोसले, मोहन शिंदे यांनी फिर्यादीस लाथाबुक्याने छातीत व पोटात मारहाण केली व व्यकंटेश हुल्लूर याने फिर्यादीचे गळ्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादीने आरोपीविरुद्ध फौजदार चावडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये पोलिसांनीं १) समाधान सरवदे २) किरण सरवदे ३)बापू सरवदे ४)बाबासाहेब भोसले ५) मोहन शिंदे ६)बाळू भोसले यांना अटक केली होती.

यामध्ये अटक होईल ह्या भितीने सुनिल भोसले याने अँड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

सुनील भोसले यांना अटकपूर्व जामीन मंजूर

यात आरोपीतर्फे ॲड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा घटनेच्या वेळी घटनास्थळी हजर नसल्याचा पुरावा मे.न्यायालयाचे निदर्शनास आणून दिला.सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यात आरोपीतफे ॲड.संतोष न्हावकर, ॲड. वैष्णवी न्हावकर, ॲड. शैलेश पोटफोडे, ॲड.राहुल रुपनर, ॲड. मिरा पाटील, ॲड. श्रेयांश मंकणी यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. रामपूरे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here