पुणे,दि.17: राष्ट्रवादी काँग्रेसवर आमनेसामने आलेले शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीचा बिगुल वाजवला आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले. अशा परिस्थितीत अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.
सुनेत्रा पवार याही अलिकडच्या काळात राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या अनेक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसून येत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार फोकस करत आहेत. या मतदारसंघावर विशेष लक्ष देत आहेत. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करणारच असे अजित पवार यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनीही दौरे वाढवले आहेत.
अजित पवार यांच्या कुटुंबियांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहे. शिरुरमधील अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहे. सुनेत्रा पवार या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. यावेळी त्या खेळ पैठणीचा ही खेळला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणा ही घेतला.