सोलापूर,दि.९: शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर दाखल होणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात शिवसेनेचे सचिव तथा सोलापूर संपर्क नेते संजय मशिलकर यांच्यासह शहर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेतली व त्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की शिवसेना जिल्हाप्रमुख काळजे यांच्यावर मागील तीन महिन्यांमध्ये सतत एका पाठोपाठ असे तीन खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. या अगोदर झालेल्या दोन गुह्यांमध्ये पोलीस चौकशीअंती सबळ पुरावा न मिळाल्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये ब फायनल करण्यात आल्याचे दिसून आले आहे, अशा खोट्या प्रकारचे गुन्हे यापुढे होऊ नयेत. पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी शिवसेनेचे लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, मनोज शेजवाल, महेश साठे, सतिश सपकाळ, संजय देशमुख, चरणराज चवरे, राजीव बाबर, नंदकुमार मोरे, समाधान दास, कल्पना स्वामी, समीर शेख, मुक्ता खंदारे, जस्मिन पठाण, दादासाहेब पवार, सैफन पटेल यांच्यासह शिवसेनेचे शहर-जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.