सोलापूर,दि.२: श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलचे क्रिडाशिक्षक श्री सोमशेखर ईरप्पा भोगडे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती बदल श्री सिध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी शाल आणि हार घालून सत्कार केला. तसेच शिक्षण संमिती सदस्य अभियंता व्ही.बी बुन्हापुरे, प्रा डॉ राजशेखर येळीकर, जी. एन कुमठेकर, गुरूराज माळगे, मल्लिकार्जुन कळके, भीमाशंकर पटणे, मुख्यकार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा, समन्वयक संतोष पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य धनंजय शिरूर यांच्या शुभहस्ते सोमशेखर भोगडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशालेतील जेष्ठ शिक्षिका निता तमशेटी, रेणूका अरोरा, श्रुती कुलकर्णी यांनी भोगडे सरा बद्दल आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोमशेखर भोगडे यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेतील आठवणीना उजाळा दिला.आणि सर्वांचे आभार मानले. तसेच प्राचार्य धनंजय शिरूर यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षक शिवराज बिराजदार, प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संस्कृतीक प्रमुख अंजली खानापुरे यांनी केले.