शिवसेनेचे आणखी काही आमदार नॉटरिचेबल! आज मातोश्रीवर बैठक

0

मुंबई,दि.23: शिवसेनेचे (Shivsena) आणखी काही आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. आज मातोश्रीवर बैठक घेण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले असून शिवसेनेने भाजपाबरोबर (BJP) सरकार स्थापन करावे अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे अनेक आमदार आहेत. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहभागी होणार आहेत. मात्र, ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार की ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. या बैठकीत आता शिवसेना आता उरलेल्या आमदारांच्या बळावर कोणते डावपेच आखणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी बुधवारी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्ष प्रमुखपद सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र, राज्याबाहेर गेलेल्या शिवसेना आमदारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांगावे, असेही म्हटले. फेसबुक लाइव्हनंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या वर्षा ते मातोश्री या दरम्यानच्या प्रवासात हजारो शिवसैनिक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. उद्धव ठाकरे यांनी काही ठिकाणी शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here