Solapur: सोलापूरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी जारी केले आदेश

0

सोलापूर,दि.31: School Reopen In Solapur: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोलापुरसह राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सोलापूर शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील पूर्व प्राथमिक व इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना संदर्भीय शासन परिपत्रक क्रमांक 1 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. तथापी संदर्भीय परिपत्रक क्रमांक 1 व 2 मध्ये दिनांक 24 जानेवारी 2022 पासून शाळा सुरु करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका यांना अधिकार प्रदान करण्यात आले होते, त्यानुसार शहारातील कोविड-19 चा प्रभाव कमी न झाल्यामुळे पूर्व प्राथमिक व इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये घेण्यात आलेला होता. सद्यस्थितीत सोलापूर महानगरपालिक क्षेत्रातील कोविड -19 चा प्रादुर्भाव, शिक्षकांचे कोविड-19 च्या चाचण्या व लसीकरण तसेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता मंगळवार दिनांक 01/02/2022 पासून पूर्व प्राथमिक व इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यास उपरोक्त शासन परिपत्रकात नमूद तसेच खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी राहील.

हेही वाचा Urfi Javed: उर्फी जावेद तिच्या नव्या पोशाखामुळे पुन्हा झाली ट्रोल



शाळा पूर्वतयारी मार्गदर्शक सूचना :
1. आपल्या शाळेतील UPHC सेंटरला पत्रव्यवहार / संपर्क करुन सर्व संबंधित शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे 100 % लसीरकण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे.
2. शाळेतील सर्व वर्गखोल्या सर्व स्वच्छतागृहे व संपूर्ण शालेय परिसर निर्जतुकीकरण करुन घेणे.
3. शाळेत उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्याच्या पालकांचे लेखी संमतीपत्र जमा करुन घेणे.
4. शाळेतील प्रत्येक वर्गाचे वेळापत्रक वेगवेगळे करणे ( उदा. 1 ली चा वर्ग स. 08.00 वा बोलावला असल्यास इ. 2 री चा वर्ग 7.45 / 8.15 ला बोलावावे, सोडतानाही असेच करणे आवश्यक आहे. )
5. वेळापत्रकानुसार कोणतीही मधली सुट्टी ठेवू नये.
6. शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघाची वेळोवेळी ऑनलाईन बैठक घेऊन सर्व बाबींची सविस्तर चर्चा करुन शंकानिरसन करणे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनजागृती करणे.
7. शाळासमोरील खुल्या जागेत 2 मीटर अंतरावर वर्तुळ / चौकोन आखणे.

8. शाळास्तरावर आवश्यकतेनुसार कार्यगट / आपती व्यवस्थापन समिती करणे, हेल्थ क्लब स्थापन करणे, तसेच शाळेमध्ये आवश्यकतेनुसार सॅनिटायजर, थर्मलगन, पल्स ऑक्सी मिटर ठेवणे.
9. आरोग्य विभाग व इतर महत्वाचे मो. क्र. / हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागावर लिहिणे.
10. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविणे व शक्यतो त्याची तीच जागा कायम ठेवणे.
11. वर्गात व शालेय परिसरात सर्वांनीच मास्कचा वापर करणे.
12. सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी शाळेच्या वेळेत पूर्णवेळ मास्कचा वापर करावा.
13. विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत तसेच शाळेच्या परिसरात वावरताना नेहमीच किमान 06 फूट शारीरिक अंतर ठेऊन आंतरक्रिया करावी आणि त्या अनुषंगाने उपक्रमाचे वेळापत्रक व बैठक व्यवस्थेचे नियोजन करावे.
14. सर्व वर्गखोल्या, दरवाजे, हँडल, खिडक्या, हॅडरिल, टेबल, बेंच, स्वच्छतागृहे दररोज निर्जंतुकीकरण करावे.
15. भविष्यात शाळेमध्ये एखादा विद्यार्थी / शिक्षक / कर्मचारी कोविड 19 संशयित / POSITIVE आढळल्यास
a. जवळच्या UPHC च्या वैद्यकीय अधिकारी यांना कळवून संबंधितास UPHC सेंटरमध्ये दाखल करावे.
b. सर्व शाळा व परिसर चांगल्याप्रकारे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. शाळेतील सर्व शिक्षकांचे कोविड -19 चाचणी करुन कोविड 19 चा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच संबंधितास शाळेत उपस्थितीची परवानगी द्यावी.
C. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल POSITIVE असतील त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोविड -19 NEGATIVE असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच संबंधिताना शाळेत उपस्थित रहावे. d . ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल NEGATIVE आहेत , त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड 19 च्या संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे . e . दरम्यानच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत होणार नाही , यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन करावे.
16. शाळा सुरु असताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलाविण्यात यावे. उदा. वर्गाना अदलाबदलीच्या दिवशी / सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या ( Core ) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी संदर्भीय शासन परिपत्रकात नमूद सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. शाळा सुरक्षितपणे सुरु रहावी यासाठी आपलेकडील उपलब्ध परिस्थितीचा साकल्याने विचार करुन मुख्याध्यापक यांनी त्यांचे स्तरावर आवश्यक ते नियोजन करावे.
17. कोविड बाधीत विद्यार्थी वर्गामध्ये आढळल्यास पुढीलप्रमाणे कृती योजना करण्यात यावी.
a. तो विद्यार्थी वर्गामध्ये ज्या रांगेत बसतो त्यांच्या मागील पुढील आणि दोन्ही बाजूच्या 03 रांगेतील विद्यार्थ्याना निकट सहवासित मानावे.
b. याशिवाय इतर कारणामुळे बाधित विद्यार्थ्यांच्या निकट संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांची / शिक्षकांची यादी करावी.
C. अशा निकट सहवासित विद्यार्थ्यांना 02 आठवड्याकरिता होम क्यारंटाईन करावे. याकाळात ज्यांना कोविड -19 चाचणी करुन घ्यावी. ज्यांच्यामध्ये कोविड लक्षणे दिसून येत नाही अशा विद्यार्थ्यांनी 5-10 दिवसानंतर कोविड 19 चाचणी करुन घ्यावी.

d. ज्या वर्गात विद्यार्थी कोविड बाधित आढळून आले त्या वर्गातील बेंच 1 % सोडियम होयपोक्लोराईड द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात यावी तसेच स्वच्छतागृहे, सामायिक जागा यांचे निर्जतुकीकरण करुन घ्यावे.
e. शाळेत काही विद्यार्थी / शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोणी बाधित आढळल्यास शाळेत आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी मुख्याध्यापक व प्रशासनाने घ्यावी. मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती, शालेय व्यवस्थापन, पालक शिक्षक संघ यांचे मदतीने सर्व बाबी लक्षात घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करावी. शाळा सुरक्षितपणे व योग्य वातावरणात सुरु करणेची जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्यामुळे शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल असे नियोजन करावे. शाळा पूर्वतयारी पूर्ण झालेबाबत लेखी अहवाल ज्या मुख्याध्यापकांनी अद्याप सादर केला नाही, त्यांनी आजच तात्काळ पर्यवेक्षक यांचेकडे सादर करावा.

शाळाभेटीवेळी ज्या शाळांमध्ये कोविड -19 च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही, त्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांचेवर निश्चित करुन दंडात्मक कार्यवाही केली जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित पर्यवेक्षक यांनाही जबाबदार धरले जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. प्रत्येक दिवशी याबाबत गांभीर्याने कार्यवाही होईल यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन यांनी कटाकक्षाने लक्ष द्यावे. आपल्या दुर्लक्षामुळे एकही विद्यार्थी किंवा शिक्षक कोविड पॉझीटव्ह होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे नियमित पालन करुनच शालेय कामकाज पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. कोविड -19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील. असे आयुक्त पी शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here