मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर-गोवा विमानसेवा शुभारंभास राहणार उपस्थित 

0

सोलापूर,दि.८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-गोवा विमानसेवेचा शुभारंभ सोमवार ९ जून रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. (The Solapur-Goa flight service will be inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis on Monday, June 9) पहिल्या विमानात बसणाऱ्या पाच प्रवाशांना मुख्यमंत्री  फडणवीस हे बोर्डिंग पास देणार आहेत. या शुभारंभ कार्यक्रमासाठी सुमारे दीड हजार जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. येथील व्यावसायिकांच्या वतीने पहिल्या विमानातील प्रवाशांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

विमानसेवा शुभारंभाची जयत तयारी सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटन समारंभासाठी येणार आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हेही येण्याची शक्यता असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सोलापूर-गोवा विमानसेवा

शुभारंभ कार्यक्रमासाठी जवळपास दीड हजार सोलापूरकरांना निमंत्रण देण्यात आले आहे. विमानतळ परिसरात वॉटरफ्रूप मंडप तसेच भव्य स्टेजची उभारणी होत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे तयारीचा आढावा घेत आहेत. 

यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, नगर अभियंता सारिका आकुलवार, राष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे चंद्रेश वंजारा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज ठाकरे  आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here