सोलापूर,दि.1: Solapur Exit Poll: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 48 जागांचा समावेश असून मतदार महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला हे पाहावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे औत्सुक्याचं आहे. टीव्ही 9 पोलस्ट्रॅटने महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमकं काय चित्र असेल याचे अंदाज वर्तवले आहेत. (Exit Poll)
टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 23 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. तर इतरांना 1 जागा मिळेल.
भाजपाला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. तर मविआत काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला 6 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ | Solapur Exit Poll
टीव्ही 9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या आघाडीवर आहेत तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर आहेत. येथे प्रणिती शिंदे विजयी होण्याचा अंदाज आहे.
धाराशीव मतदारसंघ
तर धाराशीव मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या पिछाडीवर आहेत. येथे ओमराजे निंबाळकर विजयी होणार असल्याचा अंदाज आहे.