सोलापूर: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिले हे आदेश

0

सोलापूर,दि.३१: कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) उंबरठ्यावर आल्याची शक्यता गृहीत धरून आरोग्यासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (District Collector Milind Shambharkar) यांनीही ऑक्सिजन प्लान्ट व बेड सज्ज ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याबाबत तयारी करण्याबरोबरच चाचण्या वाढविण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियोजनातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.

गुरूवारी, नियोजन भवनात जिल्ह्याच्या टास्क फोर्सची आढावा बैठक जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. आर. डी. जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, कोविड नोडल अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. बसवराज लोहारे, डॉ. अतिश बोराडे, डॉ. अरूण काटकर, सहायक कामगार आयुक्त अशोक कांबळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त राहुल काटकर, सहायक आयुक्त अन्न व औषध ध. अ. जाधव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडील सर्व साधन सामग्रीचा आढावा घेतला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सर्व विभागांनी दक्ष राहावे. जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्लान्ट व ऑक्सिजन प्रोसेस प्लान्ट सुरू असणे आवश्यक आहे. ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी सर्व टँकमध्ये ऑक्सिजन भरून ठेवणे गरजेचे आहे. सर्व सीसीसी, आयसोलेशन सेंटर पूर्ववत चालू करावे लागले तर त्या अनुषंगाने सर्व तयारी करावी.

ऑक्सिजन बेड व इतर काही आरोग्यविषयक साधनसामग्री तपासून घ्याव्यात. कोरोना टेस्टींग किट मुबलक
प्रमाणात उपलब्ध असल्या पाहिजेत. जास्तीत जास्त टेस्ट होणे आवश्यक आहे. सर्व आरोग्य यंत्रणांनी कोणताही हलगर्जीपणा न करता सर्व नियोजन व्यवस्थित करावे, अशा सूचना शंभरकर यांनी दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here