सोलापूर,दि.२२: सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघातात साखरपुडा झालेल्या जोडप्याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात मृत झालेल्या जोडप्यांचा रविवारी (दि. १५) साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर अवघ्या चार दिवसांतच दोघांचा अकाली मृत्यू झाला आहे. (Solapur-Dhule highway accident)
नियोजित नववर–वधूचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा (सध्या मुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय २३) यांचा विवाह होणार होता. मात्र त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
नववधू अक्षया हिची रविवारी लातूर येथे महापारेशनची परीक्षा होती. त्या परीक्षेसाठी पहाटे वाशी येथून घरच्या कारने (MH 25 BF 5064) तिघे लातूरकडे निघाले होते. सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारचा पुढील भाग पूर्णतः चुरडला गेला. या भीषण धडकेत अक्षया सुनील चव्हाण आणि अक्षय रामभाऊ शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला.








