Solapur Corona: सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा मोठी वाढ तर शहरात…

0

सोलापूर,दि.13: Solapur Corona: पुन्हा एकदा सोलापूर शहरापेक्षा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण घट होत आहे. आज प्राप्त अहवालात ग्रामीणमध्ये शहरापेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर 83 अहवाल प्राप्त झाले. यात 82 निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 0 पुरुष व 1 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही.

सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या… | Solapur Corona

काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 11 आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 36 झाली आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 34732 झाली आहे. तर यापैकी 33177 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1519 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 969 पुरुष व 550 महिलांचा समावेश आहे.

ग्रामीणमध्ये रुग्ण संख्येत पुन्हा मोठी वाढ

कालच्या अहवालात (दि.12) 27 रुग्ण आढळले होते. तर आज सोलापूर जिल्हा ग्रामीण 246 अहवाल प्राप्त झाले, यात 217 निगेटिव्ह तर 29 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 16 पुरुष व 13 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 187569 झाली आहे. तर यापैकी 183749 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3731 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2422 पुरुष व 1309 महिलांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here