Solapur Corona Report: सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये कोरोना बाधितांची संख्या झाली…

0

सोलापूर,दि.6: Solapu Corona Report: महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. सोलापूर शहरापेक्षा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये कोरोना बाधितांची एकूण (ॲक्टीव्ह) संख्या 78 झाली आहे. सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्येत कधी वाढ तर कधी घट होत आहे. आज प्राप्त अहवालात ग्रामीणमध्ये शहरापेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर 68 अहवाल प्राप्त झाले. यात 62 निगेटिव्ह तर 6 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 1 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही.

Solapur Corona Report | सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या…

काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 9 आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 42 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 34716 झाली आहे. तर यापैकी 33155 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1519 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 969 पुरुष व 550 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या…

सोलापूर जिल्हा ग्रामीण 156 अहवाल प्राप्त झाले, यात 146 निगेटिव्ह तर 10 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 4 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 1 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 36 झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 187495 झाली आहे. तर यापैकी 183728 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3731 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2422 पुरुष व 1309 महिलांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here