सोलापूर शहर व जिल्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ, आज वाढले – – –

0

सोलापूर,दि.6: सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर 252 अहवाल प्राप्त झाले. यात 231 निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 10 पुरुष व 11 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत 2. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 143 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 14 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33907 झाली आहे. तर यापैकी 32256 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1508 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 963 पुरुष व 545 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 125 अहवाल प्राप्त झाले, यात 105 निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 17 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 87 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 17 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 186240 झाली आहे. तर यापैकी 182246 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3727 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2421 पुरुष व 1306 महिलांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here