सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण 755 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.31: सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना चाचण्यांची संख्या कमी आहे. सोलापूर शहरातील चाचण्यांच्या प्रमाणात नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे तर जिल्हा ग्रामीण चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 730 अहवाल प्राप्त झाले, यात 576 निगेटिव्ह तर 156 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 91 पुरुष व 65 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात एक जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2314 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 645 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 183545 झाली आहे. तर यापैकी 177533 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3698 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2403 पुरुष व 1295 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर 1038 अहवाल प्राप्त झाले. यात 986 निगेटिव्ह तर 52 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 27 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात दोन जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2147 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 110 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32905 झाली आहे. तर यापैकी 29213 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1485 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 947 पुरुष व 538 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here