Solapur Band: बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा मनसेचा सोलापूर बंदला विरोध

Solapur Band:स्वतःच्या अजेंड्यावर सोलापूर बंद करून दाखवण्याचे आव्हान

0

सोलापूर,दि.14: सोलापूर बंदला (Solapur Band) बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा व मनसेने विरोध केला आहे. स्वतःच्या अजेंड्यावर सोलापूर बंद (Solapur Band) करून दाखवा असे आव्हान दिले आहे. महापुरुषांच्या अवमानाविरुद्ध 16 डिसेंबर रोजी सोलापूर बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडीने सोलापूर बंदचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान झाल्यामुळे नव्हे तर मुंबईतील नेत्यांना खूश करण्यासाठी सोलापूर बंद पुकारला आहे. या बंदमध्ये नागरिक, व्यापाऱ्यांनी सहभागी होउ नये, असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना, भाजपच्या आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. 

Solapur Band | सोलापूर बंदला विरोध

महाविकास आघाडीला स्वतःचा अजेंडा नसल्यामुळे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा वापर करत आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी सोलापूर बंदचा नारा दिला आहे. त्यामुळे सोलापूर बंदला आमचा पाठिंबा नाही असे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. हिंमत असेल तर स्वतःच्या अजेंड्यावर सोलापूर बंद करून दाखवा असा इशारा देखील सोलापूर बंदचा नारा देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेतेमंडळींना दिला.

Solapur Band

सोलापूर बंदची हाक

छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. याच्या निषेधार्थ शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने सर्वपक्षीय, सर्वधर्मीयांतर्फे 16 डिसेंबर रोजी सोलापूर बंदची हाक दिली आहे. आता या सोलापूर बंदवरुन मतभेद निर्माण झाले आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केला असून या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असे सांगत या बंदमध्ये कोणीही सहभागी होऊ नये असे बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, भाजपचे अनंत जाधव, श्रीकांत घाडगे, मनसेचे प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर यांनी केले आहे.

ज्यांच्याकडून महापुरुषांचा केली अनादर झाला त्या लोकांचा जाहीर निषेधच आहे. मात्र, अवमानकारक वक्तव्ये ज्यांनी केली त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे, माफी मागितली आहे. मात्र, काही राजकीय पक्ष व संघटनांकडून अस्मितेचा विषय करून महाराष्ट्रसह सोलापूरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा बंद शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून घोषित केला आहे. या मंडळाच्या माध्यमातून महाविकास आघाडी छुपा अजेंडा वापरत असल्याचा आरोप यावेळी या संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

उदयनराजे आले तर बंदमध्ये सहभागी होणार

सोलापुरातील नेते कुणाला तरी खूश करायला आंदोलन करतात असे तुम्ही म्हणता. खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात आंदोलन केले. हे कशासाठी होते या प्रश्नावर अमोल शिंदे म्हणाले, उदयनराजे आमचे दैवत आहे. उदयनराजे सोलापुरात येउन आंदोलन करणार असतील तर आम्ही सर्वजण बंदमध्ये सहभागी होउ, असे शिंदे म्हणाले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here