सोलापूर,दि.18: सोलापूरात झालेल्या अपघातात (Accident) एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूर एसटी स्थानकापासून जवळच पुणे नाका परिसरातील मुख्याध्यापक भवन समोरील रस्त्यावर ट्रकखाली सापडून (One killed after being crushed by a truck in Solapur) एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकने चिरडल्यामुळे शीतलनाथ आहेरकर यांचा अपघातात जागीच जीव गेला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघाताचा पंचनामा करुन पोलिसांनी मृत शीतलनाथ आहेरकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी शासकीय रुग्णालयातही पाठवला आहे. दरम्यान, सध्या सोलापूर पोलीस या अपघातप्रकरणी आणखी तपास करत आहेत.
सोलापूर पोलीस या अपघातप्रकरणी आणखी तपास करत आहेत. नेमका हा अपघात कसा झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. या अपघात प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतल्याचीही माहिती दिली आहे.या ट्रकवरील माहितीच्या आधारं फरार चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातो आहेत.