SMC News: सोलापूर महापालिकेचे 1075 कोटीचे अंदाजपत्रक सादर

0

सोलापूर,दि.२०: SMC News: सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२३-२४ अंदाजपत्रक आज उपायुक्त तथा मुख्यलेखापाल विद्या पोळ यांनी आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मछिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत आदी मान्यवर उपस्थित होते. आयुक्त शीतल तेली उगले यांनी सुमारे १०७५ या कोटीचे प्रशासकीय बजेट गुरुवारी पत्रकारांसमोर सादर केले. यामध्ये सोलापूर महानगर पालिकेला विविध बाबींनी पासून मिळणारे उत्पन्न ६७७ कोटी २७ लाख ४७ हजार एवढे दाखवण्यात आले आहे तर भांडवली कामांसाठी उपलब्ध होणारी रक्कम ७० कोटी ४८ लाख इतकी दाखवण्यात आली आहे.

तसेच या बजेटमध्ये केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान ३२४ कोटी ९४ लाख इतके दाखवण्यात आले आहे.

करापासून उत्पन्न :

सोलापूर शहर परिसर पर्जन्यछायेचा व दुष्काळी भाग आहे. येथील शरासरी पर्जन्यमान्य ५४५ मि.मी. इतके आहे. तसेच सोलापूर शहरास उजनीतून पाणीपुरवठा हा साधारणतः १०० कि.मी. लांबीच्या पाईपलाईन मधून होतो. मालमत्ता कर विभागाकडून शहर व हद्दवाढ विभागातील मिळकतदारांना खालील प्रमाणे मिळकत करामध्ये सवलत दिली जाते.

● बिल दिल्यापासून १५ दिवसाचे आत रक्कम भरल्यास ५% डिजीटल मोड मध्ये रक्कम भरल्यास १% असे एकूण ६% सवलत देण्यात येते.

• ज्या मिळकतदाराकडे रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम आहे त्यांना २% व सोलर सिस्टीम बसविले असेल तर ५% मिळकत करामध्ये सुट देण्यात येते.

• अक्कलकोट रोड एम. आय. डि.सी. व होटगी रोड औद्योगिक वसाहतीतील सर्व मिळकतदाराना व शहर व हथवाद भागातील यंत्रमागधारकांना मुदतीत मिळकत कर भरल्यास २५% सवलत देण्यात येते.

• माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये १००% सवलत देण्यात येते.

• दिव्यांग मिळकतदारांना त्यांच्या मिळकतकराच्या ५०% अथवा कमाल रु.५०००/- सवलत दिली जाते.

• शहरातील मालमत्तांच्या बाबतीत ज्या त्या भागांनुसार भांडवली मुल्यवर्धित कर लागू करण्याचे प्रस्तावीत आहे. यामुळे मिळकत करामध्ये समानता येऊन कर आकारणीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता निर्माण होणार आहे.

NCAP (राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम) राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम अंतर्गत हवेतील प्रदूषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्यत्न करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी महानगरपालिकेने शहरातील १० मुख्य वर्दळीच्या ठिकाणी धूळ नियंत्रित करण्यासाठी पाण्याचे कारजे तयार करणे. १० ठिकाणी नागरीकांसाठी हरीत पट्टा तयार करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणेचे प्रमाण कमी करणेकामी ती जागा विकसित करून तेथे नागरीकाना बसण्याठी जागा विकसित करणे, २१ ठिकाणचे डिव्हायडरची उंची वाढविणे, कलर करणे व सुशोभिकरणाची झाडे लावणे, शहराच्या एन्ट्री पॉइंटच्या ठिकाणी पुना नाका येथे व्हर्टिकल गार्डन तयार करणे, तेथील आयलंड सुशोभिकरण करणे, याबाबत आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तसेच शहरातील ८ प्रमुख वर्दळीच्या रस्ते धुळमुक्त करणेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या कामामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभाग

• सोलापूर महानगरपालिकेने १९० घंटागाड्यासह सर्व वार्डामध्ये ५ प्रकारात म्हणजे ओला, सुका, घरगुती घातक घरगुती सॅनीटरी आणि ई कचरा असे स्त्रोत पासूनच वर्गीकरण केले जात आहे.

• सोलापूर शहरातील मृत जनावरे यांचे दहन करणेकामी विद्युत दाहिनी प्रकल्प उभे करण्याचे काम करण्यात येत आहे. शहरातील वाढत्या कचन्याचे प्रमाण आणि वाहतुकिचे खर्च कमी करण्याकरीता नव्याने अधिकचे २ ट्रान्स्फर स्टेशन उभे करण्यात येणार आहे.

• सोलापूर शहरातील निर्माण होणारा बांधकाम व पाडकाम कचरा म्हणजेच C&D Waste वर प्रक्रिया व पुर्नवापर करणे करीता १५० टन प्रति दिन क्षमतेचे CSD Waste प्रकल्प उभारण्याचे करारपत्र करण्यात आलेले असून काम सुरु करण्यात आलेले आहे.

• बायोमायनिंग प्रकल्प सोलापूर शहरातील संकलन केलेले कचऱ्याचे वाहतुक करणे व प्रदुषणमुक्त करण्यासाठी अधिकधी ६ CNG रिफ्युज कॉम्पेक्टर प्राप्त होणार आहे. सोलापूर शहरातील जुना तुळजापूर रोडयेथे असणारे ५.७८ लाख टन जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंगव्दारे प्रक्रियेचे कार्यादेश देवून काम सुरु करण्यात आले आहे.

• प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृती व दंडात्मक कारवाई हाती घेऊन शहर प्लास्टीक मुक्त करण्यात येणार आहे वर्ष २०२२-२३ मध्ये र.रु. १३.५ लाख इतकी दंडात्मक वसूली ची कारवाई प्लास्टीक बाबत करण्यात आली आहे.

• सुका आणि ई-कचरा संकलनाची स्वतंत्र सुविधा हस्तांतरणाच्या वेळी रुपाभवानी ट्रान्स्फर स्टेशन वर विकसीत केलेली आहे त्याच प्रमाणे इतर तीन ट्रान्स्फर स्टेशन येथेही सदर व्यवस्था उभी करण्यात येणार आहे.

• स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत निधी मंजूर प्रकल्पांची अंमलबजावणी जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here