स्लीपर कोच बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात होरपळून १० जणांचा मृत्यू 

0
स्लीपर कोच बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात होरपळून ९ जणांचा मृत्यू

बेंगळुरू,दि.२५: Sleeper Coach Bus Accident: स्लीपर कोच बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एकुण मृतांचा आकडा १७ झाला आहे. रस्ता अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटकातील चित्रदुर्गातील हिरीयुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील गोरलट्टू गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. यात सतरा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेंगळुरूहून गोकर्णाकडे जाणाऱ्या स्लीपर कोच बसची एका भरधाव ट्रकशी धडक झाल्याने हा अपघात झाला. बसने पेट घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, बस बेंगळुरूहून निघाली होती. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, बस गोरलट्टू गावाजवळ येताच, हिरीयुरहून बेंगळुरूकडे जाणारी एक लॉरी अचानक रस्त्याचे दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने आली आणि थेट बसला धडकली. धडक इतकी भीषण होती की बसने लगेचच पेट घेतला आणि काही क्षणातच संपूर्ण बसला आगीने वेढले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, धडकेनंतर बसमध्ये गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी मोठ्याने ओरडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. एका प्रवाशाने सांगितले की, धडकेनंतर तो त्याच्या सीटवरून पडला, नंतर काच फोडून बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. तथापि, आग इतक्या वेगाने पसरली की अनेक प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत.

या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून हिरीयुर आणि चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलिस, अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. स्थानिक प्रशासनाने जखमींना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here