मुंबई,दि.16: कोव्हिशिल्ड नंतर आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले आहेत. कोव्हिशिल्ड (Covishield) नावाची कोरोना लस तयार करणाऱ्या AstraZeneca ने कबूल केले आहे की तिच्याद्वारे बनवलेल्या लसीमुळे लोकांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे लक्षात घेण्याजोगे आहे की कोविशील्डचे 1 अब्ज 70 कोटी डोस भारतात दिले गेले.
कोरोना लसीपासून आणखी काही साईड इफेक्ट असल्याचे बनारस हिंदू विश्वविद्यालयाने प्रकाशात आणले आहे. यामुळे तरुण, तरुणींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
बनारस हिंदू विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनामध्ये तरुणांमध्ये केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तसेच त्वचा रोग, डोके दुखी आणि तरुणी-महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमित येण्याची समस्या देखील वाढल्याचे दिसून आले आहे. ज्या लोकांनी कोरोना झाल्यानंतर लस घेतली त्यांच्यात या समस्या वाढल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे.
भारतात बनलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुष्परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये 304 तरुणांनी आणि 124 प्रौढांनी लस घेतल्यानंतर श्वसनमार्गाचा विषाणूजन्य संसर्ग झाल्याचे सांगितले. किशोरवयीन मुलांमध्ये सर्वात सामान्य प्रतिकूल परिणाम केस गळणे किंवा त्वचेचे विकार (10.5%), सामान्य विकार (10.2%) आणि मज्जासंस्थेचे विकार (4.7%) होते. तर, प्रौढांमध्ये सामान्य विकार (8.9%), मस्कुलोस्केलेटल विकार (5.8%) आणि मज्जासंस्थेचे विकार (5.5%) हे परिणाम जाणवले.
लसीकरणाच्या एक वर्षानंतर लोकांवर याचा काय परिणाम झाला, हे जाणण्यासाठी बीएचयूच्या आरोग्य विज्ञान संस्थेने जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२३ मध्ये ६३५ तरुण आणि २९१ १८ वर्षांवरील लोकांवर अभ्यास केला. हा अहवाल मेडिकल जर्नल स्प्रिंगर लिंकमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
कोरोनाचे औषध बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने आपल्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे प्रथमच मान्य केले आहे. AstraZeneca ने UK उच्च न्यायालयात कबूल केले की कोविड-19 लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सारखे दुष्परिणाम होऊ शकतात.