सोलापूर,दि.13: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी राजीनामा दिला आहे. श्रीकांत देशमुख यांचा एका महिले सोबतचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये श्रीकांत देशमुख महिले बरोबर दिसत आहेत.
एका महिलेने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांचा बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मोठी बदनामी झाली. हा व्हिडिओ मंगळवारी दुपारी प्रसारमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला.
त्यानंतर काही वेळातच श्रीकांत देशमुख यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला. चंद्रकांत पाटील यांनी तो तातडीने स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे दिला आहे तसे त्यांनी पत्र प्रसारमाध्यमांना पाठवले.
देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहे. देशमुख हे अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेले आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे.
हे वाक्य ऐकताच देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित देशमुख यांनी त्या महिलेवर हनीट्रॅपच्या आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
श्रीकांत देशमुख यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी आपली बाजू मीडियासमोर मांडली आहे. संबंधित महिलेने गुंगीचे औषध दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
श्रीकांत देशमुख म्हणाले
श्रीकांत देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, या महिलेने ग्रीन टी मध्ये गुंगीचे औषध घालून माझ्याबरोबर आक्षेपजनक व्हीडिओ बनविला. त्यानंतर चारित्र हननाचा प्रयत्न केला. यात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, तसेच संबंधित महिलेविरुद्ध मी ओशिवारा अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये हनी ट्रॅपिंग व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
ऑडिओ क्लीप व्हायरल
देशमुख आणि संबंधित महिला यांच्यातील 17 मिनिटांची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. मोबाईलवर बोलताना या महिलेने देशमुखांना म्हटले आहे की, बाळासाठी मी तुमच्यावर प्रेम केले. लग्न केले. तीन वर्षे सोबत राहिले. तरीही मलाच बदनाम केले जात आहे. मी आता तुम्हाला सोडणार नाही. फडणवीसांशीही या विषयावर सविस्तर बोलणार आहे. तुम्ही आता आमदार कसे होता, हे पाहते. माझी हाय तुम्हाला लागली आहे.