गुरुपौर्णिमा उत्सव व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन साजरा

0

अक्कलकोट, दि.१३: पावसाच्या सरी झेलत..! श्री स्वामी समर्थ महाराज की… जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक व कोल्हापूर येथील हलगी पथक यांच्या निनादात मान्यवरांच्या हस्ते व सन्मानीयांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला.

दरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दु. ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात अतुल बेहरे पुणे यांच्या नादब्रम्ह या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ मराठी सिनेअभिनेता स्वप्निल जोशी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. माजी नगरसेवक अमोलबापू शिंदे, चेतन नरोटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संकेत पिसे यांच्या हस्ते करण्यात आला.

रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली.

या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त व संयोजक अमोलराजे भोसले यांनी अचूक नियोजन केल्याने सदरचे विविध कार्यक्रम भारदार संपन्न झाले. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याचे पाऊचचे पालखी मार्गावर वाटप करण्यात आले.

याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुरोहित मंदार पुजारी, सुरेशचंद्र सूर्यवंशी, मिलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, उद्योगपती संदीप फुगे-पाटील, नादब्रम्ह ढोल पथक प्रमुख अतुल बेहरे, दिलीप सिद्धे, संजय शिंदे, अनिल पानसे, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तम गायकवाड, अविनाश मडीखांबे, सुनील बंडगर, राजेंद्र हजारे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार श्वेता हुल्ले यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here