Shivshahi Bus Accident: शिवशाही बसचा गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात, एकाचा मृत्यू

0
शिवशाही बस अपघात

अमरावती,दि.25: Shivshahi Bus Accident: शिवशाही बसचा गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. नागपूर महामार्गावर शिवशाहीचा भीषण अपघात झाला आहे. गाईला वाचवण्याच्या प्रयत्न शिवशाही पलटी झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.

Shivshahi Bus Accident | शिवशाही बसचा अपघात

रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. नागपूरहून ही शिवशाही बस अकोल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. मात्र अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर बसच्या समोर एक गाय आली. तिला वाचवण्याचा प्रयत्न शिवशाही बस चालकाने केला. यादरम्यान त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

या अपघातात शिवशाहीच्या चालकालाही दुखापत झाली आहे. हा अपघात नक्की कसा झाला याबाबत माहिती देताने त्याने सांगितले की, नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन निघालो होतो. त्याचवेळी महामार्गावर अचानक बससमोर एक गाय आली. गाईला वाचवण्यासाठी करकचून ब्रेक दाखले आणि बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक घडलेल्या घडामोडीत बस पलटी झाली. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 35 प्रवासी होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here