शिवसेना नेते संजय राऊत यांचं सुप्रीम कोर्टातील सूनावणीबाबत मोठं वक्तव्य

0

नवी दिल्ली,दि.11: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुप्रीम कोर्टातील सूनावणीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सुप्रीम कोर्ट देणार असलेला निकाल हा शिंदे सरकारबाबत नसून देशाच्या लोकशाहीबाबत असल्याचे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या देशात लोकशाही आहे की नाही याचा निर्णय आज होईल, असेही राऊत यांनी म्हटले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने लागणार आहे, आमच्या खिशात सुप्रीम कोर्ट आहे, अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. देशातील न्यायव्यवस्था त्यांची गुलाम आहे का असा सवाल त्यांनी केला. न्याय व्यवस्था कोणाची बटीक राहू शकत नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

“राज्यामध्ये बेकायदा सरकार लादण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी राजभवन, विधीमंडळाचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्या अन्यायाविरुद्ध शिवसेना महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्यावतीन सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही, देशाचा कारभार राज्य घटनेनुसार चालतो की नाही याचा निर्णय या निमित्ताने लागणार आहे. संपूर्ण देश न्यायालयाकडे एका अपेक्षेने पाहत आहे. सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे आणि निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशी वक्तव्ये समोरच्या बाजूने केली जात आहेत. सर्वोच्च न्यायालय कोणाच्या खिशात असू शकत नाही. या देशाची न्यायव्यवस्था कोणाची बटिक किंवा गुलाम असू शकत नाही अशी आमची भावना आहे. म्हणून आम्ही आशेने सर्वोच्च न्यायालयाकडे पाहत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने लागणार आहे, आमच्या खिशात सुप्रीम कोर्ट आहे, अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. देशातील न्यायव्यवस्था त्यांची गुलाम आहे का असा सवाल त्यांनी केला. न्याय व्यवस्था कोणाची बटीक राहू शकत नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. या निष्ठा यात्रेत तळागाळातील शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिक शिवसैनिकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेबाहेर कोणी जात असतील तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये असेही राऊत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here