एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ल्याचा प्रयत्न

0

अमरावती,दि.२५: एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले असता त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला गेला. यादरम्यान संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके नारे देखील दिलेत. अमरावती संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचेवर शिवसैनिकांकडून चांगलाच चोप दिला गेला आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करित पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटातसामिल होणारे आमदार होते.एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचेसोबत राहाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसरे दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

शिंदे गटात सर्वा शेवट सहभागी झालेले आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक आज पाहायला मिळाला. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातील आमदार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीमध्ये असताना संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरेंसाठी भरसभेत त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या विश्वासमतासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. मात्र, एका रात्रीत संतोष बांगर यांनी गट बदलत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. संतोष बांगर सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे गटात गेले होते.

संतोष बांगर हे आज अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी आमदार संतोष बांगर यांची अडवण्याचा प्रयत्न केला. संतोष बांगर यांच्या गाडीच्या चालकानं वेळीच प्रसंगावधान राखत गाडी न थांबवल्यानं पुढील अनर्थ ठळला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here