शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात केला 100 कोटींचा दावा दाखल

0

मुंबई,दि.21 : भाजपाचे (bjp) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात आरोपांचा धुराळा उडवला आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती. मात्र, 72 तासानंतरही सोमय्यांनी माफी न मागितल्याने अखरे हा दावा दाखल करण्यात आला आहे.

‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु, त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे’ असं परब यांनी जाहीर केलं आहे. अनिल परब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

अनिल परब यांनी 14 सप्टेंबर रोजी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here