नवी दिल्ली, दि.8: शिवसेनेने (Shivsena) निवडणूक आयोगाला (EC) डेडलाईनच्या आधीच खणखणीत उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे? या संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने ई-मेल केले होते. त्याला आता ठाकरे गटाने वेळेच्या आधी उत्तर दिले आहे. शिवसेनेला 2 वाजेपर्यंतची वेळ दिली होती, त्याआधीच 800 पानाचे उत्तर दाखल केले आहे.
निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत शिवसेनेला दिलेली डेडलाईन संपली आहे. दुपारी दोन पूर्वी शिवसेनेच्या वकिलांची निवडणूक कार्यालयात हजेरी राहायचे होते. आज दुपारी 2 वाजेच्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे वकील सन्नी जैन निवडणूक आयोगात दाखल झाले. जैन यांनी शिवसेनेकडून कागदपत्रांची पुर्तता केली आहे. निवडणूक आयोगात प्रत्यक्ष भेटून वकिलांनी माहिती दिली. जेव्हा निवडणूक आयोग सांगेल तेव्हा कागदपत्रांची पुर्तता करू, ठाकरे गटाने इ रिप्लाय देऊन फाईल केले आहे.
गेल्या 24 तासात शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला तब्बल 800 पानांचा रिप्लाय केला आहे. दुपारी दोन पूर्वी शिवसेनेच्या वकिलांची निवडणूक कार्यालयात हजेरी लावली. गेल्या 24 तासात शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला तब्बल 800 पानांचा रिप्लाय दिला आहे.
दरम्यान, रविवारी रात्री दोन ई-मेल आल्यामुळे गोंधळ उडाला. निवडणूक आयोगाचे पत्र दिलेले होते. ही मेल आश्चर्यकारक होती. धनुष्यबाण चिन्हाबद्दल साडे चार वाजता उत्तर दिले होते. त्याची पोचपावती दिली ती आमच्याकडे आहे. कागदपत्र मिळाली नाहीत का याची तपासणी करतील. चिन्हाबद्दल 24 तासात उत्तर मागणे हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका अनिल देसाई यांनी केली.