शिवसेना उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला

0
शिवसेना उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला

मुंबई,दि.७: शिवसेना उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच राजकारण रक्तरंजित होत चालले आहे. सोलापुरात भाजपाच्या दोन गटात झालेल्या वादामुळे मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली होती. आता मुंबईत शिवसेना (शिंदे गट) उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

पूर्वी बिहारमध्ये गुन्हेगारी घटना घडत होत्या. आता महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नेते कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना आता शिवसेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाला आहे. प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

मुंबईतील वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला झाला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.  

बांद्रा इथल्या ज्ञानेश्वर नगर इथे झाला हल्ला. हाजी सालिन कुरेशी प्रभागात प्रचार करत असतानाच अज्ञात इसमांनी त्यांच्या पोटात चाकू मारल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. हल्ल्यात हाजी सालिन कुरेशी रक्तबंबाळ झाले.  हाजी सालिम कुरेशी यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here