उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र येणार असल्याचा शिंदे गटातील आमदाराचा दावा

0

सोलापूर,दि.6: उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र येणार असल्याचा दावा शिंदे गटातील आमदाराने केला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी हा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यानंतर, आता आमदार शहाजी पाटील यांनीही एक हजार टक्के मोदी-ठाकरे एकत्र येणार असल्याचं म्हटलं आहे. 

मात्र, उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे, आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे, पण, यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपासोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

एक हजार टक्के नरेंद्र मोदीसाहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, असा माझा अंदाज आहे. हा अंदाज कधीही चुकणार नसल्याचं वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे. तसंच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे निवडणुकीतील सर्व्हे चुकीचे असल्याचं ते म्हणाले. मध्यप्रदेश ,राजस्थान त्याचबरोबर बीआरएसचा सर्व्हेदेखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा. हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. निवडणूक ही मताला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन करत असल्याचं आमदार शहाजी पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here