MLA Anil Babar: शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

0

सांगली,दि.31: MLA Anil Babar: शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काल सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते. सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

2019च्या निवडणूकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1990, 1999, 2014, 2019 ला आमदारकीला ते निवडून आले होते.

आमदार अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी होते. खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. टेंभू योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी खानापूर, तासगाव, खटाव, सांगोला यासह अन्य तालुक्यातील टेंभूपासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे यासाठी टप्पा क्रमांक सहाचा मंजुरी प्रस्ताव सभागृहात मांडून त्यास मान्यता घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here